मुंबई: पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. निकालानंतर विरोधी पक्षनेते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( on )

‘विधान परिषद निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. आम्ही अधिक जागांची अपेक्षा केली होती. मात्र, केवळ एकच जागा आम्हाला जिंकता आली. खरंतर, महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीचा आमचा अंदाज चुकला,’ अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे.

वाचा:

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनुक्रमे अरुण लाड व जयंत आसगावकर (अधिकृत घोषणा बाकी) यांनी बाजी मारली आहे. औरंगाबाद पदवीधरमध्ये फडणवीस यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शिरीष बोराळकर यांना महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार स्पर्धेतूनच बाद झाले आहेत. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलेला व फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. तिथं महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा धुव्वा उडवला आहे. हा निकाल भाजपसाठी व फडणवीसांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

वाचा:

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here