प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार उद्यानात एक जोडपे बसलेले असताना त्यांना पाच, सहा तरुणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीसोबत असलेल्या तरुणाने कॉल करून त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी या तरुणांवर हल्ला चढविला. त्यानंतर दुसऱ्या गटातील तरुणांनी देखील आपल्या साथीदारांना बोलावून घेत राडा केला. जवळपास २० ते २५ तरुण एकमेकांवर तुटून पडल्याचे अनेकांनी मोबाइलमध्ये शूट केले. नागरिकांनीच पोलिसांना ही माहिती दिली.
घटनास्थळावर पोलिसांचे वाहन येताच तरुणांनी उद्यानातून दिसेल त्या मार्गाने धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले असता प्रेम प्रकरणातून राडा झाल्याची कबुली त्यांनी दिली. तुंबळ हाणामारीचा व्हीडिओ पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचला. त्यांनीही आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानतंर सांयकाळी उशिरापर्यंत इतर तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times