कॅनबेरा : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला आजच्या सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण तरीही तहल आजच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आपल्या पहिल्याच षटकात चहलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला बाद करत भारताला मोठे यशही मिळवून दिले. पण चहलने या सामन्यात गोलंदाजी केली, कारण आयसीसीच्या नव्या नियमांचा चांगलाच फायदा यावेळी भारतीय संघाला झाला.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली.

काय सांगतो आयीसीसीचा नवा नियम…आयसीसीच्या नव्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी बदली खेळाडू संघात येऊ शकतो. जो खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, त्याच्याजागी हा बदली खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. या नव्या नियमानुसार जडेजा दुखापतग्रस्त झाल्यावर चहलला संघात स्थान देण्यात आले. चहलने या संधीचे सोने करत पहिल्याच षटकात भारताला मोठे यश मिळवून दिले.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली. राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here