विधान परिषदेच्या निकालावर () प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ‘भाजपच्या रूपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. या गरजेतूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचा निकाल हा या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे १०५ आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा सावंत म्हणाले.
वाचा:
वर्षानुवर्षे भाजपच्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही त्यांच्या हातून निसटला आहे. फडणवीसांकरिता वारसा हक्काच्या या मतदार संघातून त्यांचे वडील लढले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तो गड त्यांना राखता आलेला नाही. ५५ वर्षांपासूनचा भाजपाचा हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत. मतदारांनी भाजपाला नाकारले आहे, असं ते म्हणाले.
वाचा:
‘चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सुशिक्षित मतदार बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. केंद्रातीलम मोदी सरकारमुळेच हे झाल्याची लोकांची खात्री झाली आहे. सुशिक्षित मतदारांनी हा राग मतदानातून व्यक्त केला. याशिवाय, मागील वर्षभरापासून भाजप महाराष्ट्र द्रोही भूमिका घेत होता. पत्रकार अर्णव गोस्वामी, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात होता. मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला भाजपचे नेते झाशीची राणी म्हणत होते. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा सातत्यानं अवमान केला जात होता, तो संतापही निवडणुकीतून व्यक्त झाला,’ असा दावाही सावंत यांनी केला.
वाचा:
भाजपवर नामुष्की ओढवलेली असल्यानं ऑपरेशन कमळला (Operation Lotus) आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांमागे लावले जाईल, अशी शक्यताही सावंत यांनी बोलून दाखवली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times