महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळं काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नुकतंच केलं होतं. यावरून भाजपनं काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसची पोलखोल झाली आहे असं सांगून भाजप नेते संबित पात्रा यांनी काँग्रेसचा मुस्लीम लीग काँग्रेस असा उल्लेख केला. चव्हाण यांनी हिंदूंचा अपमान केला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही तोफ डागली. ओवेसी हे जिन्ना होण्याच्या मार्गावर चालले आहेत, असंही ते म्हणाले.
पात्रा यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा हवाला देत काँग्रेसनं हिंदूंचा अपमान केला आहे, असं ते म्हणाले. आंदोलनाच्या आडून हिंदूंना शिवीगाळ केली जात आहे. काँग्रेसचा एक नेता म्हणतोय की, फक्त मुस्लिमांच्या सांगण्यावरून सत्तेत सहभागी झालो आहे. मग हिंदू, शीख आणि पारसींनी काय गुन्हा केला आहे. काँग्रेस मुस्लिमांना विचारून सरकार चालवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times