मुंबई: कुख्यात गँगस्टर इकबाल मिर्चीच्या कुटुंबीयांनाही फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात यावे, अशी विनंती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. ईडीने केलेल्या या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रकरणात ईडीने शुक्रवारी विशेष पीएमएल न्यायालयात अर्ज केला आहे. इकबाल मिर्चीच्या कुटुंबीयांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात यावे, अशी विनंती अर्जात केली आहे. इकबालची पत्नी हाजरा मेमन, जुनैद इकबाल मेमन आणि आसिफ इकबाल मेमन या त्याच्या दोन्ही मुलांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची विनंती ईडीने केली आहे. तसेच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याची परवानगीही अर्जाद्वारे मागितली आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ईडीच्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील केजे हाऊसच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील मालमत्तेसह (अंदाजे किंमत ९६ कोटी) पंधरा भारतीय मालमत्तांवर टाच आणण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. तसेच यात सहा बँक खात्यांचाही समावेश आहे. या बँक खात्यांमध्ये १.९ कोटी रुपये शिल्लक आहेत. फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत ईडीला पुरवणी अर्ज सादर करण्याचीही परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीही या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याआधी याआधी मिर्चीसह त्याचे कुटुबीय आणि इतरांच्या ७९८ कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here