पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनेश्वर शर्मा यांच्या निधनानंतर ट्विट केले आहे. लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांनी भारताच्या पोलिस प्रणाली आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये दीर्घकाळ योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दित दहशतवादाविरोधात अनेक संवेदनशील अभियानांमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्या निधनान मी दु:खी आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रकट केला शोक
लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाने आपण दु:खी असल्याचे केंद्री गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाने आपण अतिशय दु:खी झालो आहोत. त्यांनी भारतीय पोलिस सेवेतील समर्पित अधिकारी म्हणून अत्यंत समर्पणासह राष्ट्राची सेवा केली. दु:खाच्या या प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
लक्षद्वीपचे प्रशासक स्तब्ध करणारे: कोविंद
लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे निधन स्तब्ध करणारे आहे, असे यांनी म्हटले आहे. ते एक उत्तम पोलिस अधिकारी होते. ते अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेतील विशेषज्ञ होते. त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times