सांगली: पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून एक अपवाद वगळता पुणे विभागात ३६ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने पराभवाची धूळ चारली आहे. यांच्या विजयाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना शह दिला, तसेच गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टेही काढले. सत्तेत आल्यानंतर प्रथमच मिळालेल्या यशाने राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण आणखी घट्ट करण्यास मदत झाली आहे. ( Latest News Updates )

वाचा:

सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या भूमीतील अरुण लाड हे कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गेल्यावेळी त्यांनी बंडखोरी करून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. सोळा हजाराहून अधिक मते मिळवून त्यांनी या मतदारसंघातील स्वतःची तयारी दाखवली. मात्र, त्यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. बंडखोरीनंतरही राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत त्यांनी जवळीक कायम ठेवली. नियमित मतदार नोंदणीतून ते पदवीधरांच्या संपर्कात राहिले. गेल्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अखेरच्या क्षणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

वाचा:

महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकजूट दाखवली. गावपातळीपर्यंत बैठका, मेळावे घेऊन यंत्रणा गतिमान केली. गेल्या निवडणुकीत झालेली बंडखोरी आणि नेत्यांमधील दुफळी टाळून राष्ट्रवादीने चूक सुधारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनीच अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित केली होती, यामुळे प्रचारात मंत्री पाटील आघाडीवर राहिले. अरुण लाड हे वयस्कर उमेदवार असल्याची टीका विरोधकांकडून झाल्यानंतरही लाड यांनी टीकेला प्रत्युत्तर न देता नियोजनबद्धरितीने मतदारांपर्यंत पोहोचण्यात बाजी मारली. शांत, संयमी स्वभाव, गेल्या आठ-दहा वर्षांपासून केलेली मतदार नोंदणी, जनसंपर्क आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवल्याने अरुण लाड यांना दणदणीत विजय मिळवता आला.

वाचा:

पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या दिवशीच राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागा जिंकू, असा दावा केला होता. याशिवाय विरोधक तिघे, चौघे एकत्र आले तरीही आम्ही एकटेच भारी पडू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. निकालानंतर मात्र त्यांनी एकटे, एकटे लढा मग बघू, अशी प्रतिक्रिया दिली. विधान परिषदेच्या सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे समीकरण अधिक घट झाले आहे. यापुढील निवडणुकांमध्येही एकत्र लढूनच भाजपला रोखण्याचा प्रयत्न करू शकते.

१९ हजार ४२८ मते अवैध

उमेदवाराच्या नावापुढे पसंती क्रमांक लिहून मतदान करण्याच्या पद्धतीत १९ हजार ४२८ पदवीधर नापास ठरले. २ लाख ४७ हजार ६८७ मतांपैकी १९ हजार ४२८ मते बाद ठरली. पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतांवर समाधान मानावे लागले. एकूण मतदान २ लाख ४७ हजार ६८७ इतके झाले. त्यापैकी २ लाख २८ हजार २५९ मते वैध ठरली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here