नगर: ‘राज्यातील नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं,’ असा सल्लाच राज्यमंत्री यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. उगाच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या फंदात कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण कराल, असा टोलाही तनपुरे यांनी भाजप नेत्यांना लगावला. ( On )

वाचा:

पदवीधर, शिक्षक व मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे निकाल हाती आले असून यामध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आता निवडणुकीतील विजयानंतर ‘ ‘च्या नेत्यांकडून भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले जात आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनीही ट्वीट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

वाचा:

‘विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत मते मिळवत विजयरथ खेचून आणला आहे. मतांच्या माध्यमातून सुजाण नागरिकांनी महाविकास आघाडीवर असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला आहे. आता यापुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं. उगाच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या फंदात कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण कराल,’ असा टोला तनपुरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून लगावला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here