मुंबई: विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. उपमुख्यमंत्री यांनी देखील निकालावर प्रतिक्रिया देताना, ‘हा निकाल म्हणजे वाचाळवीरांना चपराक’ आहे असं म्हटलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर माजी खासदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ( targets over )

वाचा:

वाचा:

नीलेश राणे यांनी ट्वीट करून अजित पवारांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘वाह अजितदादा वाह!! ज्यांना चपराक बसली म्हणताय, त्यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली होती हे विसरलात का? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

पुणे व नागपूरच्या सर्व जागा जिंकून भाजपची मक्तेदारी आम्ही मोडीत काढलीय. आजच्या विजयावरून सुशिक्षित आणि शिक्षक आमच्या पाठिशी असल्याचे सिद्ध झालं आहे. बडबड करणाऱ्या वाचाळवीरांना ही चपराक आहे. या निकालामुळं महाविकास आघाडीचं बळ दिसून आलं आहे. भविष्यातील निवडणुकाही एकत्रित लढण्याचा विचार आम्ही करत आहोत. आमच्या वेगळे लढण्याने विरोधकांचे फावायला नको, हा विचार करून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील. अमरावतीची जागा जिंकता आली असती, तर आणखी आनंद झाला असता. तिथं जे घडलं त्याचं दुःख आहे,’ असं पवार म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here