अहमदाबाद:
गुजरातमध्ये सायबर क्राइमचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. पोलीसही या क्राइममुळे हैराण झालेत. एका महिलेच्या क्रेडिट कार्डावरून चोरट्यांनी आधी ४९,८५१ रुपये काढले आणि नंतर त्याच अकाउंटवर २०,१३१ रुपये जमा देखील केले!

अहमदाबादमधील आंगन सोसायटीमध्ये राहणाऱ्या पूजा बॅनर्जी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पूजा एका खासगी कंपनीत काम करतात. एफआयआरमध्ये म्हटलंय की ‘१३ जून २०१९ रोजी पूजा यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलरने त्यांना तो बीआरटीएस कम्प्लेंट बोर्डवरून बोलत असल्याचे सांगितले. त्याने पूजा यांना एक मेसेज पाठवत म्हटले की त्यांनी या क्रमांकावर २० रुपये जमा करावेत. पूजा यांनी आपल्या क्रेडिट कार्डातून २० रुपये दिले. त्यांना २० रुपये कट झाल्याचा मेसेजही आला.’

पण काही वेळातच पूजा यांना मेसेज आला की त्यांच्या क्रेडिट कार्डावरून ४९,८५१ रुपये काढले आहेत. दुसऱ्याच दिवशी पूजा यांनी आपलं क्रेडिट कार्ड ब्लॉक केलं होतं. त्यांनी क्राइम ब्रान्चच्या सायबर सेलला तक्रारही दाखल केली होती. पण थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्याच दिवशी चोरट्यांनी पूजा यांच्या क्रेडिट कार्ड अकाउंटवर २०,१३१ रुपये जमाही केले होते.

बिहारमध्ये खरेदी

पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले आहे की चोरांनी बिहारच्या नालंदा जिल्ह्याच्या बिहारशरीफमध्ये एका मॉलमधून चोरांनी २९,७२० रुपयांची खरेदी केली. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here