बुलडाणा: शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात दोन बाल गुन्हेगारांनी बंद खोलीत गळफास घेतल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश लक्ष्मण डाबेराव (१५), गजानन शंकर पांगरे (१७, रा. शेगाव) अशी या मुलांची नावे आहेत. या मुलांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजले नाही. (Suicide at )
वाचा:
चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात एकूण आठ जण होते. पैकी मृतदेह आढळलेल्या खोलीत तीन मुले होती. एक जण सुखरूप आहे. आत्महत्या करण्यात आलेली दोन मुले पंधरा दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून पळून गेली होती. त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आले होते. दोघांची आत्महत्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, दोघांनी संगनमताने आत्महत्या केल्याचे त्यातून दिसून येत आहे. आत्महत्येसाठी एकमेकांना त्यांनी मदत केल्याचे त्यात दिसून येत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times