नवी मुंबई: एमआयडीसीतील मोदी केमिकल या कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आणखी काही जवानाना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ()

तळोजा एमआयडीसीतील भूखंड क्रमांक जे ३९ वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मात्र आगीची व्याप्ती मोठी असल्याने सिडको, अंबरनाथ येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, जळणाऱ्या केमिकलच्या विषारी धुराची काही जवानांना बाधा झाली. यात अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकातील बाळू देशमुख (३२) या जवानाचा श्वास गुदमरला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. इतर काही जवानांना देखील स्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा:

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जवानांमध्ये तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सकाळपर्यंत प्रयत्न करत होते. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून, आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here