नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर जवळपास आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज आणि केंद्रीय मंत्री यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. आज (शनिवारी) या आंदोलनाचा नववा दिवस आहे.

वाचा :

वाचा :

LIVE अपडेट :

– खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन समाजवादी पक्षाचे नेते दिल्ली – नोएडाच्या चिल्ला सीमेवर दाखल झाले होते. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेणार नसल्याचं नम्रपणे स्पष्ट कर शेतकऱ्यांनी त्यांना माघारी पाठवलं.

– कृषी कायद्यासंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी शेतकरी प्रतिनिधीमंडळ विज्ञान भवनाकडे रवाना झाले

– हे विरोधी नेत्यांचं राजकारण आहे. विरोधकाकांडून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न होतोय. आजच्या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल : कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी

– या चर्चेच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसंच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले आहेत.

– केंद्र सरकारनं तीन्ही काळे कायदे मागे घेत किमान हमीभाव देण्यावर लिखित आश्वासन द्यावं. आजच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर राजस्थानातूनही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून दिल्लीकडे कूच करतीय : रामपाल जाट, अध्यक्ष, किसान महापंचायत

– आज दुपारी २.०० वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

वाचा :

वाचा :

– आज होणाऱ्या पाचव्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, अशी आशा भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलीय.

– आज शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार आणि सरकारच्या कॉर्पोरेट धोरणांचा निषेध केला जाणार आहे.

– शेतकरी संघटनांकडून येत्या मंगळवारी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय.

– याअगोदर ३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्ययांवर विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here