मुंबई : सद्यस्थितीत विकासक विविध प्रकारच्या आकर्षक सवलती आणि सूट देऊ करत आहेत, त्याकडे ग्राहक आकर्षित होणं सहज शक्य आहे. पण गृहखरेदीचा निर्णय घेताना व्यावहारिक विचार करणं फार गरजेचं आहे. ग्राहकांनी मार्केटमधल्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला हवा, त्यासाठी अभ्यास आणि संशोधन करायला हवं आणि त्यानंतर गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याची खात्री देणाऱ्या घराची निवड करावी.

‘न्यू नॉर्मल’च्या परिस्थितीत खालील काही टिप्स इच्छूक गृहखरेदीदारांना मदत करतील.
– आज बघितलं तर मार्केटमध्ये पत असलेल्या मालमत्तांची संख्या मोठी असल्याचं दिसून येईल. अशा मालमत्तांचा शोध घ्या. त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, पण ही शोधाशोध करण्यात कंटाळा करून नका. मालमत्ता विक्रेता किंवा गुंतवणुकदाराचं एक उद्दिष्ट्य असतं, त्याने केलेल्या गुंतवणुकीवर किमान परतावा किंवा नफा मिळवणं. खरेदीदारांनी थोडा रिसर्च करावा आणि पाच-सहा वर्षांपूर्वीच्या किमतींना आधार मानून सौदेबाजी सुरू करावी. अशाप्रकारे खरेदीचा मार्ग निवडला तर चांगली डिल मिळू शकते.

वाचा :

– बँकेची पूर्व मंजुरी(प्री-अप्रूव्हड) असलेलं गृहकर्ज हातात असणं आणि गृहखरेदीचा व्यवहार करण्याची एक मुदत निश्चित केल्याने खूप फायदा होतो. खरेदीदाराचं समोरच्यावर खूप वजन पडतं.

– भार असलेली अंडर कन्स्ट्रक्शन मालमत्ता विकासकाकडून घेण्याचा विचार करत असाल तर, संबंधित गृहप्रकल्पाच्या विकासकाचे अधिकार त्या विकासकाकडेच असल्याची खात्री करून घ्या. तसंच तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं पुरेसं आर्थिक पाठबळ असल्याची शहानिशाही करा.

वाचा :

– संबंधित प्रकल्पातल्याघरांची विक्री ब्रोकर्स कशी करतात, याचा अनुभव घ्या. अनेक एजण्टांशी बोला आणि चांगल्यात चांगली डिल मिळवण्याचा प्रयत्न करा.

– अनेक गृहप्रकल्पांशी सौदे करून ते मोडण्याचं टाळा.

– ज्या गृहप्रकल्पात घर घेण्यासाठी बँका सहज कर्जं देतात, असे प्रकल्प गुंतवणुकीसाठी सुरक्षित असतात. कारण सर्व मंजुऱ्या, परवानग्या असणाऱ्या आणि कायदेशीर वादात नसलेल्या प्रकल्पांमध्ये घर घेण्यासाठी बँका कर्जं देण्यास नकार देत नाहीत.

– झोपडपट्टीच्या खूप जवळ, जिथे महामारी उग्र रूप धारण करू शकते, अशा प्रकल्पांमध्ये घर घेणं टाळा.

– रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कमीकिंमत आणिकमी जोखीमेचासौदा उत्तम ठरेल.

– गृहकर्जासाठी बँकेची निवड करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. जी बँक कमीत कमी व्याजदर आकारायला तयार असेल, तिला प्राधान्य द्या. व्याजदर एमसीएलआर किंवा रेपो रेटशी संलग्न असावेत.

– घराचं बजेट निश्चित करताना, कोव्हिड संकटामुळे काही अडचणी येणार नाही, याची खात्री करून घ्या. आकस्मिक खर्चासाठी नियोजन करून ठेवा.

– रेरा वेबसाटवर जाऊन संबंधित गृहप्रकल्पाशी संबंधित मंजुऱ्या, आराखडे, विक्री झालेली घरं यासंदर्भातली माहिती तपासून घ्या.

– एखादं घर निश्चित करताना त्यातली एखादी रूम ‘होम ऑफिस’मध्ये रूपांतरित होऊ शकते का, हे बघून घ्या. कारण महामारी किंवा त्याच्यासारख्या संकटाचा सामना आणखी काही वर्षं करावा लागू शकतो.

– काही कारणांमुळे परिस्थिती बिघडली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी लागू होऊ शकते, अशा परिस्थितीत मदतनिसाविना तुम्हाला घराची देखभाल करावी लागू शकते. त्यामुळे घर घेताना त्याचं भान राखणं अधिक चांगलं.

– फिटनेसला महत्त्व देत असाल तर घराचा एखादा भाग छोटेखानी जिममध्ये करता येईल का, ही शक्यताही तपासा.

– रिसेलमधलं घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या सोसायटीत कोव्हिड-१९ संसर्गाची किती प्रकरणं समोर आली आहेत, हे जाणून घ्या. त्यावरून आरोग्य समस्या उद्भवते तेव्हा तिच्याशी दोन हात करण्यासाठी सोसायटीची किती तयारी असते, याचा अंदाज येईल. ते शक्य नसेल तर सोसायटीत क्लब हाऊस किंवा मोकळी जागा असल्याचं बघून घ्या, भविष्यात विलगीकरण कक्ष सुरू करायला ही जागा कामी पडेल.

– नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातच घर घ्या, जिथे आजूबाजूला आरोग्य सेवा उपलब्ध असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here