मुंबईः महापालिकेत भाजपनी मुसंडी मारत थेट ४८ जागांपर्यंत झेप घेतली आहे. भाजपच्या या यशानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार? याची चर्चा सुरु झाली असतानाच भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची विधानं समोर येत आहेत.

मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भाजपनं मिशन मुंबई मोहिम हाती घेतली आहे. हैदराबाद प्रमाणेच मुंबईतही जनतेचा कल भाजपसोबत असेल, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. राम कदम यांनीही मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा फगवा फडकणार असल्याचा, दावा केला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार,’ असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला आहे.

‘शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. करोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्याही लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई पालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here