याप्रकरणी अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी कोर्टात हा अर्ज दाखल केला होता. अबूधाबी येथील ‘एएफसीओ इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट’ या कंपनीने डीएसकेंचा ड्रीम सिटी प्रोजेक्ट विकसित करण्याचा प्रस्ताव दिला असून त्यासाठी आगाऊ रक्कम देण्यास ते तयार आहेत. कोर्टाने त्यांना परवानगी दिल्यास विकसनाचे नियम करुन काम सुरु करता येईल, त्यासाठी परवानगी देण्यात यावी,तसेच त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांना देता येतील, असे अर्जात नमूद करण्यात आले होते.
कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. विशेष सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध केला. संबंधित दावा तडजोडीचा नाही. अशा प्रकारे अर्ज दाखल करुन कोर्टाचा वेळ वाया घालविण्यात येतो आहे, त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे करण्यात आला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times