महाविकास आघाडीने पदवीधर निवडणुकीत बाजी मारल्यानंतर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आव्हान देत पुन्हा एकदा डिवचलं आहे.
‘सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळं आता सरकार पाडण्यासाठी किती महिने लागणार, हे सांगणार नाही, भाजपच्या इतर नेत्यांनीही सरकारसंदर्भात बोलणं बंद केलं कर अधिक चांगलं ठरेल,’ असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
पराभव मान्य
‘राजकारणात यश- अपयश होत असते. भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व आहे. त्यामुळं चार- पाच जागांच्या निकालात काही मागे पुढे झालं तर हुरळून जायची गरज नाही. आम्ही पराभव खुल्या मनाने स्वीकारतो. या पराभवाची कारणंही आम्ही शोधली आहे. भविष्यात भाजप गेलेल्या मतदारसंघही राखेल,’ असा दावा त्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times