मुंबई- पंजाबी गायक आणि अभिनेता याने सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता त्याने सिंधू सीमा (हरियाणा-दिल्ली सीमा) गाठली असून तिथे त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांज याने शेतक्यांना १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

दिलजीत यावेळी म्हणाला की, ‘आमची केंद्राला फक्त एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सर्व लोक इथे शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सांगितला जाईल. शेतकर्‍यांचे प्रश्नांना कोणीही भरकटवू नये.’

दिलजीत पुढे म्हणाला की, ‘आज मी इथे बोलण्यासाठी नाही तर ऐकायला आलो आहे. पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आभार. आपण पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.’ यानंतर, थट्टेच्या स्वरात बोलताना दिलजीत बोलला की मी मुद्दाम हिंदीत बोलत आहे जेणेकरून नंतर गुगल करावं लागणार नाही.’

‘इथे शेतकऱ्यांशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट होत नाहीए. त्यामुळे हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांना जे काही हवं आहे, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. प्रत्येकजण शांततेत बसलेला आहे. कोणत्याही रक्तपाताची चर्चा इथे होत नाहीए. ट्विटरवर बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात आणि विषय भरकटवला जातो.’

दिलजीत दोसांजने आपलं म्हणणं पुढे स्पष्ट केलं की, ‘आम्ही प्रसारमाध्यमांकडे विनंती करतो की कृपया त्यांनी हे सर्व दाखवावं. आम्ही सर्व शांततेत बसलो आहोत आणि आज संपूर्ण देश एकत्र आहे. कृपया आम्हाला पाठिंबा द्या आणि सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here