याबाबत गावस्कर म्हणाले की, ” मी आयसीसीच्या बदली खेळाडूच्या नियमाशी सहमत नाही. तुम्ही मला जुनाट विचारांचे म्हणाल, पण जर तुम्ही बाऊन्सरचा योग्यपणे सामना करू शकत नाही आणि त्यानंतर चेंडू तुमच्या डोक्याला लागतो. तेव्हा माझ्यामते हा पर्याय घेण्याच्या लायक तुम्ही नाही आहात.”
गावस्कर यांनी पुढे सांगितले की, ” सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी आयसीसीचे सामनाधिकारी हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बून होते. जर जडेजाच्या जागी चहलला खेळवताना त्यांना कोणतीही अडचण आली नसेल किंवा प्रश्न पडले नसतील तर माझे काहीच म्हणणे नाही. नियमांनुसार जसा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, तसाच बदली खेळाडूही असला पाहिजे. म्हणजे फलंदाज दुखापतग्रस्त झाला तर बदली खेळाडू हा फलंदाजच असायला हवा. जर सामनाधिकारी यांनी भारतीय संघाला जडेजाऐवजी चहलला खेळण्याची परवानगी दिली असेल तर याबाबत मला कोणतीही समस्या नाहीत.”
रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला सवालमांजरेकर म्हणाले की, ” जेव्हा जडेजाला मैदानात दुखापत झाली होती तेव्हा फिजिओ त्याला पाहायला मैदानात का गेला नाही. जडेजाच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. जर कोणत्याही खेळाडूला जेव्हा दुखापत होते, तेव्हा फिजिओ लगेच धावत मैदानात जातात. खेळाडूला कुठे दुखापत झाली आहे ते पाहतात, त्याचबरोबर त्याच्यावर उपचार करून तो खेळू शकणार की नाही, हेदेखील सांगतात. पण जडेजाच्या बाबतीत मात्र तसे झालेले पाहायला मिळाले नाही. त्यानंतर उशिराने सामना सुरु झालेला पाहायला मिळाला.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times