नवी दिल्लीः ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे. या संसद भवनजवळ एक ( ) बांधण्यात येत आहे. नवीन संसदेची इमारत कशी असेल याचं चित्रही समोर आलं आहे. येत्या गुरुवारी १० डिसेंबरला दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांच्या हस्ते ९७१ कोटी रुपये खार्चाच्या नवीन संसद भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला ( ) यांनी शनिवारी ही माहिती दिली.

नवीन संसद भवनचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबरला दुपारी १ वाजता होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाच्या सोहळ्यास सुरुवात होईल, असं ओम बिर्ला म्हणाले. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गेले. भूमिपूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींना त्यांनी निमंत्रित केलं.

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं मंदिर आणि देशाच्या विविधतेचं प्रतिबिंबित असेल. जुन्या संसद भवनपेक्षा ते १७,०० चौरस मीटर मोठे असेल. ही इमारत ९७१ कोटी रुपये खर्चून ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रात उभारली जाईल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला बांधण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. एचसीपी डिझाईन, नियोजन आणि व्यवस्थापन खासगी लिमिटेड यांनी ही रचना तयार केली आहे, अशी माहिती ओम बिर्ला यांनी दिली.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन संसद भवनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होईल. नव्या संसदेच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी जवळपास ८८८ जागा आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी ३२६ पेक्षा जास्त जागा असतील. लोकसभा हॉलमध्ये एकाच वेळी १२२४ सदस्य बसू शकतील, असं ओम बिर्ला यांनी सांगितलं.

लोकशाही वारसा पहायला मिळेल

लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांव्यतिरिक्त नवीन इमारतीत भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दाखवण्यासाठी इतर वस्तूंबरोबरच घटनेची मूळ प्रत, डिजिटल प्रदर्शन यासह पाहुण्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे त्यांना संसदीय लोकशाहीच्या रूपाने भारताच्या प्रवासाविषयी माहिती मिळेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here