चंदिगडः शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री ( ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांना चंदिगडच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हरसिमरत कौर बादल यांची करोना टेस्टदेखील झाली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या. त्या केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या. कृषी कायद्यांचा निषेध करत त्यांनी मोदी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्राचे नवीन कायदे शेतकर्‍यांसाठी धोकादायक असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. एवढेच नव्हे तर सुखबीर बादल यांनी पंजाबमधील निवडणूक स्वबळाने लढवण्याची देण्याची घोषणा केली होती. कृषी कायद्यांनाविरोध करत केंद्रातील सत्ताधारी एनडीएमधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडला आहे.

अकाली दल पंजाबमध्ये कृषी कायद्यांना करत करत आहे. तर काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे कृषी कायद्यांवरून अकाली दलावर सतत आरोप करत आहेत. अकाली दलाला घेरत आहेत. अकाली दल केंद्र सरकारमध्ये होते तेव्हा हे कायदे केले गेले. त्यावेळी विरोध का नाही केला, असा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here