पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव ( ) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांच्यासह १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी करोना व्हायरस संकटाच्या काळात कुठलीही परवानगी न घेता गांधी मैदानाबाहेर शेतकर्‍यांना पाठिंबा देत धरणे आंदोलन केलं होतं, असा आरोप आहे. त्यांच्याविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आरजेडी आणि कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांना पाठिंबा देत गांधी मैदानाच्या गेट नंबर ४ येथे धरणे आंदोलन केलं. यावेळी सर्व आंदोलकांना प्रशासनाकडून वारंवार समजावून सांगितलं केलं. तिथून जाण्याची विनंती केली गेली. पण तरीही कुणीही तिथून बाजूला झालं नाही.

तेजस्वी यांच्यासह इतर नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात आमदार आलोक मेहता, रामानंद यादव, माजी मंत्री श्याम रजक, रमाई राम, माजी आमदार शक्तीसिंग यादव यांचा समावेश आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह इतरांचा समावेश आहे. या सर्वांविरूद्ध कलम १८८, १४५, २६९ आणि २७९ नुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

तेजस्वी यादव यांनी पाटण्यातील गांधी मैदानाच्या गेटवर आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेध करतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंब आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. हा संकल्प करतो, असं तेजस्वी यादव म्हणाले.

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे. सरकारने एमएसपीचा उल्लेख न करणं म्हणजे कृषी क्षेत्र खासगी हातात विकलं जात असून त्याचं खासगीकरण केलं जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

सरकारने दिलेला चर्चेचा प्रस्ताव म्हणजे ढोंग आहे. सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून एमएसपीचा कायदा बनवावा. ८ तारखेला पुकारलेल्या भारत बंदलाही पाठिंबा देऊ. संपूर्ण देश शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले. एमएसपी नसेल तर शेतकऱ्यांवर दबाव आणला जाईल. बाजार समिती व्यवस्था कायम ठेवावी आणि शेतकर्‍यांना रास्त दर मिळावेत. कृषी क्षेत्र खासगी हातात जाऊ नये, ही आमची मागणी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here