बॉलीवूडचा सुपरस्टार ट्विटरवर ट्रेंड होतोय. त्याने #AskSRK हा हॅशटॅग सुरू केला आहे. किंग खानने त्याच्या फॅन्सना त्याला कोणतेही प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं होतं. त्याला त्याच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि शाहरुखनंही मजेदार उत्तरं दिली. एकाने विचारलं की तुझे सर्व सिनेमे फ्लॉप होत आहेत, कसं वाटतंय? उत्तर नक्की दे. यावर शाहरुखने तोडीस तोड उत्तर दिलं.
शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की ‘चला एक #AskSRK होऊन जाऊ दे. केवळ २० प्रश्न. नंतर मला जायचंय आणि स्वत:ला सामोरं जायचंय.’ यावर त्या वाचकानं तत्काळ प्रश्न विचारला होता की तुझे सिनेमे फ्लॉप होताहेत, तर कसं वाटतंय. त्याला शाहरुखनं उत्तर दिलं, ‘बस, आप दुआ में याद रखना.’
अनेक फॅन्स असेही होते, जे त्यांच्या लाडक्या शाहरुखच्या पुढील सिनेमाची वाट पाहत होते. एका फॅनने म्हटलं की तुझ्या नव्या फिल्मसंदर्भात खूप अफवा पसरत आहेत, तर तूच अनाउंस कर. यावर शाहरुख म्हणाला, ‘अरे भावा, मीच अनाउंस करणार. आणखी कोण करणार?’
शाहरुखने याव्यतिरिक्तही अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तो म्हटला, तो दिल्लीची थंडी खूप मिस करतो. याव्यतिरिक्त त्याला विचारलं होतं. की तो स्वत:ला कुठे पाहतो? यावर शाहरुख म्हणाला, ‘मला या दशकात माझ्या करिअरमधले सर्वात सुंदर सिनेमे करायचे आहेत, तिथेच पाहतो.’
शाहरुखच्या या चाहत्यांमध्ये अभिनेता रितेश देशमुखनेही प्रश्न विचारला. शाहरुखने आपल्या मुलाकडून अबरामकडून आयुष्यातला कोणता धडा शिकला आहे, असं रितेशने विचारलं. शाहरुख म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही भुकेलेले असता किंवा रागात असता, तेव्हा तुम्हाल तुमचा फेवरिट व्हिडिओ गेम खेळताना थोडंसं रडलंही पाहिजे!’
शाहरुखच्या फॅन्सना त्याच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा आहे. झिरो सिनेमानंतर त्याने आपल्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो सिनेमात तगडी स्टारकास्ट होती. आनंद एल. राय. यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times