आरोपी महिलेच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फ्लॅटच्या भाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून हे आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुलाचे आणि महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या आईला मित्राकडून समजले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. गोरेगाव पोलिसांनी २ डिसेंबर रोजी पॉक्सोंतर्गत महिलेला अटक केली. तिला कोर्टात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी महिलेच्या वकिलांनी मुलाच्या आईने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाड्याच्या पैशांवरून वाद झाल्याने त्यांनी चुकीचे आरोप केले आहेत, असे वकिलांनी सांगितले.
पेईंग गेस्ट म्हणून मुलाच्या घरी राहायची
आरोपी महिला ही एका शॉपिंग सेंटरमध्ये नोकरीला आहे. तिला एक मुलगा देखील आहे. सप्टेंबरपासून ही महिला पीडित मुलाच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तिने त्यांची खोली सोडली होती. या कालावधीत तिने अल्पवयीन मुलाचे शोषण केले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने तक्रार केल्यानंतर ती पसार झाली होती. पोलिसांनी बुधवारी तिला अटक केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times