वाचा:
‘कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काळे कायदे रद्द करावेत हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलनेही केली आहेत. राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये या काळ्या कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅलीही काढल्या आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलने करून या कायद्यांना विरोध दर्शवलेला आहे. ८ डिसेंबरच्या भारत बंदमध्येही राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहतील. यावेळी धरणे आंदोलन, निषेध मोर्चे काढून या बंदमध्ये सहभागी होतील’, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
वाचा:
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश सह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही थोरात म्हणाले.
वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकरी करत असलेल्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे. भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र असून शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होतील व या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times