एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने आता अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमा भागात कमीत कमी तीने गावे वसवली आहेत. चीनने या भागावर आपला दावा आणखी प्रबळ करण्यासाठी ही गावे वसवली असल्याचे म्हटले जात आहे. चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेशवर दावा केला जात आहे. अरुणाचल हा तिबेटचाच एक भाग असल्याची भूमिका चीनने मांडली आहे. तर, अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे. चीनने १९६२ च्या युद्धादरम्यान या ठिकाणच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला होता.
वाचा:
वाचा:
वृत्तानुसार, प्लॅनेट लॅब्सच्या १७ फेब्रुवारी २०२० च्या फोटोंच्या आधारे यावेळी फक्त एकच गाव वसवण्यात आले होते. या फोटोत २० च्या आसपास घरे असल्याचे दिसते. तर, २८ नोव्हेंबर २०२०च्या दुसऱ्या फोटोत ५० हून अधिक घरांसह तीन नवीन एन्क्लेवही दिसत आहे. या भागात रस्त्यांचेही बांधकाम झाले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
वाचा:
वाचा:
चीन आपला दावा आणखी मजबूत करण्यासाठी आणि सीमा ओलांडून घुसखोरी करण्यासाठी सीमेलगतच्या भागात वस्ती वसवत असल्याची रणनितीचा वापर करत असल्याचे चीनबाबतचे अभ्यासक डॉ. ब्रह्म चेलानी यांनी सांगतिले. चीनने भूतानच्या जमिनीवर गाव वसवले असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. चीनने वसवलेली गावे ही डोकलामपासून जवळ आहेत. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे जाणकार सांगतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times