शहरातील गांधी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे समतानगर येथे गोविंदा मुट्टीकोल त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, तसेच दगडाने ठेचून त्याचा खून झाला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाइकांशी केलेली चर्चा आणि मयत गोविंदा याच्या फोन कॉल्सवरून दोन संशयितांची नावे पुढे आली. यानुसार पोलिसांनी शक्ती खाडे आणि मिलिंद सादरे या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन खुनाच्या घटनेशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीतून गोविंदा मुट्टीकोल याचा खून केल्याची कबुली दिली.
वाचा:
गोविंदा मुट्टीकोल याचा मिलिंद सादरे आणि शक्ती खाडे या दोघांसोबत शनिवारी रात्री वाद झाला होता. वादानंतर खाडे आणि सादरे या दोघांनी गोविंदाचा काटा काढण्याचा कट रचला. यानुसार त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरी जाणाऱ्या गोविंदाला वाटेत अडवले. मिलिंद सादरे याने गोविंदाला पाठीमागून पकडले, तर शक्ती खाडे याने त्याच्याकडील धारधार शस्त्राने डोक्यात, गळ्यावर, मानेवर वार केले. यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले, अशी कबुली दोघांनी दिली. या दोघांनाही गांधी चौकी पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times