हावडा: ज्येष्ठ नागरिकांसाठी विषाणू (Coronavirus) अतिशय घातक मानला जातो. मात्र जगण्याची उर्मी या महासाथीवर मात देत आहे. पश्चिम बंगालमधील भवारिणी समंता यांचा १०० वा वाढदिवस दोन महिन्यांवर आला असताना त्यांना करोनाने गाठले. मात्र डॉक्टर आणि कुटुंबीयांचे सर्व अंदाज खोटे ठरवत त्यांनी केली. ९९ वर्षे ११ महिने इतके वय असलेल्या समंता यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर २४ नोव्हेंबरला फूलेश्वर परिसरात रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीत त्यांच्यात करोनाची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांनी कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. त्यात त्या करोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालयाचे संचालक शुभाशीष मित्रा यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांना अनेक प्रकारच्या समस्या होत्या. त्यांनी समंता यांच्यावर उपचार करण्यासाठी एक वैद्यकीय पथक गठीत केले. योग्य देखभाल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. आम्ही समंता यांना बरे करू शकलो आणि त्यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी पाठवू शकलो याचा आम्हाला अत्यंत आनंद असल्याचे मित्रा म्हणाले. शनिवारी समंता रुग्णवाहिकेद्वारे घरी निघत असताना डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी गाणे गायले, तसेच त्यांना फूल आणि मिठाई देखील दिली.

क्लिक करा आणि वाचा-
सर्वसामान्यपणे ६० वर्षांवरील व्यक्तीसाठी करोना हा अतिशय घातक मानला जातो. अशात ६० वर्षांवरील लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. ज्येष्ठांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याची वाचण्याची शक्यता अतिशय धुसर असते. असे असले तरी ८० ते ९० वर्षांच्या ज्येष्ठांनी करोनाचा पराभव केल्याची शेकडो उदाहरणे देखील आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here