सांगली: जिल्ह्यातील येथे डोंगर परिसरात करणाऱ्या ट्रकमधील जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. प्रतीक मनमत स्वामी (वय २२, रा. नागज, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. उपेन्द्र यादव (रा. झारखंड), किरण आणि संभाजी (पूर्ण नावे अद्याप समजू शकली नाहीत) या जखमींवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रचंड स्फोटाने दहा किलोमीटरवरील परिसर हादरल्याने घरांना तडे गेले आहेत. ( )

वाचा:

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे डोंगर परिसरात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अवैधरित्या जमिनीत स्फोट घडवून उत्खनन केले जात होते. या कामासाठी महाराष्ट्रासह बिहार आणि झारखंडमधील चाळीसहून अधिक कामगार कार्यरत आहेत. काम सुरू असताना तापलेल्या ड्रिलिंग मशीनचा कॉम्प्रेसर गरम होवून एका सिलिंडरसह डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात जिलेटीनच्या कांड्यांचाही स्फोट झाला. प्रचंड स्फोटामुळे खोदकाम करणारे दोन्ही ट्रक जळून खाक झाले. मोठा आवाज झाल्याने आणि धुराचे लोट पसरल्याने परिसरातील शेतांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की, ट्रकमधील प्रतिक मनमत याच्या मृतदेहाचे तुकडे पाचशे मीटर परिसरात विखुरले होते. या स्फोटाने दहा किलोमीटर परिसरातील घरांना तडे गेले आहेत. स्फोटातील तीन जखमींना परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी सावळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वाचा:

स्फोटाची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तासगावमधील अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. तासगाव पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाकडून या घटनेचा तपास सुरू आहे. अवैध उत्खनन व जिलेटिनच्या कांड्यांचा वापर केल्याबद्दल जमीन मालक व ट्रक मालकांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, भीषण स्फोटामुळे बस्तवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here