अनेकांना या आंदोलनाचा फायदा उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकर्यांचा अजिबात विचार करत नाहीए. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो. निवडणुकीच्या वेळी दीप सिद्धू माझ्यासोबत होता. आता बराच कालावधीपासून सोबत नाहीए. तो जे काही बोलतोय आणि करतोय ते त्याच्या इच्छेनुसार करतोय. त्याच्या कोणत्याही उपक्रमांशी माझा संबंध नाही. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमीच शेतकऱ्यांच्यासोबत राहणार. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याच्या विचार केला आहे आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णयावर येईल याची मला खात्री आहे, असं सनी देओल म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर सनी देओल यांनी हे पहिलंच ट्विट केलं आहे. सनी देओल यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधही केलेला नाही आणि ना पाठिंबा देणारं ट्विट केलं. पण अचानक शेतकरी आंदोलनाच्या १० व्या दिवशी सनी देओल यांनी ट्विट केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. याआधी सनी देओल हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चर्चेत होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times