पंढरपूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. वाहतूक पोलिसाने चालकाला टेम्पो थांबवण्यास सांगितले असता त्याने पोलिसाच्या अंगावरच टेम्पो घातला असून या अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली असून पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ( Accident Latest News )

वाचा:

दुर्घटनेत मृत पावलेल्या पोलिसाचे नाव सागर औदुंबर चौबे असे असून आरोपीचे नाव असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ गुट्टे हा आयशर टेम्पो (क्र. एमएच. ०४. एचडी. ०१७०) घेऊन हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता. टेम्पोत औषधोपचाराशी संबंधित साहित्य होते. दरम्यान, वरवडे टोलनाका येथे टेम्पो आला असता पोलीस नाईक यांनी तपासणीसाठी टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक नवनाथ गुट्टे याने तो इशारा न जुमानता टेम्पो थेट सागर चौबे यांच्या अंगावर घातला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या चौबे यांचा जागीच मृत्यू झाला.

वाचा:

सागर चौबे यांना धडक देऊन टेम्पो पुढे गेला होता. आरोपी नवनाथ पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र अपघातस्थळी हजर असलेल्या काही तरुणांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पोलीसही हादरले आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता वरवडे टोलनाक्यावरील घटनेची भर पडली असून पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी सेवा बजावत असलेल्या पोलिसांच्या बाबतीत घडत असलेल्या अशा घटना ही चिंतेची बाब बनली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here