रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर येथे ट्रक आणि क्वालिस कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात क्वालिसमधील दोन जण जागीच ठार झाले तर ६ जण जखमी आहेत. क्वालिस गाडीतील सर्वजण मुंबईतील चुनाभट्टी येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता हा अपघात झाला. ( Latest Updates )

वाचा:

(वय २२ रा. चुनाभट्टी,मुंबई ) (वय३२,रा. चुनाभट्टी, मुंबई ) अशी मृतांची नावे आहेत तर क्वालिस गाडीतील इतर स्वप्नील जगनाथ टाकळे (वय २१,रा. चुनाभट्टी), दीक्षा संतोष ताम्हणकर (वय २३), तनिष्का प्रकाश रसाळ (वय १२), पूजा महेश धामनस्कर (वय २८), चेतन सुधाकर सावंत (वय २१), चालक अमोल नारायण यादव (वय ३२, सर्व रा. चुनाभट्टी, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. अमोल वगळता बाकी सर्व जण किरकोळ जखमी असून अमोल याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.

वाचा:

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी संगमेश्वर रेल्वे वसाहतीच्या समोरच हा भीषण अपघात झाला. क्वालिस (क्र. एमएच. ०४ एएस. ३५४५) व ट्रक (क्र. एमएच ०८ डब्ल्यू ८४२४) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघाताची भीषणता इतकी होती की क्वालिस गाडीचा चेंदामेंदा झाला. त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक सुशांत दीपक गुरव ( वय २५, रा. भिरकोंड,संगमेश्वर ) हा घटनास्थळाहून पसार झाला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here