रायगड: आंदोलनामुळे केंद्र सरकारविरुद्ध वातावरण तापलेलं असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी केंद्राच्या कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याकडे बोट दाखवले आहे. मोदी सरकारच्या कायद्यांची बीजे शरद पवार कृषीमंत्री असतानाच रोवली गेल्याचे सांगण्याचाही एकप्रकारे फडणवीस यांनी प्रयत्न केला. ( Targets NCP Chief )

वाचा:

‘शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारावरच आताच्या केंद्र सरकारने नवीन केलेले आहेत. त्यामुळेच शरद पवार हे आज द्विधा मनस्थितीत आहेत. कायद्यांचे समर्थन करावे की त्याला विरोध करावा, असा प्रश्न पवारांना पडला आहे’, असे विधान आज फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शरद पवार यांना कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते त्यावर बोलतच नाहीत, असे नमूद करतानाच काही जण वाहत्या गंगेत हात धूत आहेत, असा मोघम टोलाही फडणवीस यांनी लगावला.

वाचा:

पंजाब आणि हरयाणा वगळता अन्य कोणत्याही राज्यात या कायद्यांविरुद्ध आंदोलन झालेले नाही. महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलन केले मात्र त्यात नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. काँग्रेसच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अजिबात प्रतिसाद नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. खरंतर विरोधकांनी हे कृषी कायदे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यांना तसे करायचे नाही. त्यातून काही जण झोपेचे सोंग घेऊन शेतकरी हिताच्या कायद्यांना विरोध करत आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांवर अंमलबजावणी संबंधी आदेश काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

वाचा:

दरम्यान, कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या ‘ ‘ला राष्ट्रवादी काँग्रेसने आज पाठिंबा जाहीर केला आहे. त्याआधी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला फटकारले होते. शेती व अन्न पुरवठा या बाबतीत पंजाब व हरयाणाचे योगदान मोठे आहे. जगातील १६ ते १८ देशांना भारत धान्यपुरवठा करतो. त्यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा वाटा खूप मोठा आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल तातडीने घ्यायला हवी होती. पण ती घेतलेली दिसत नाही. आता देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी व अन्य लोकही या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील असे चित्र असून केंद्राने वेळीच शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here