नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ( ) रविवारी भारतातील ऑक्सफोर्डच्या कोविड -१९ लस ‘कोविशिल्ड’ च्या ( ) आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज करणारी पहिली स्वदेशी कंपनी ठरली. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

करोना संकटाच्या काळात वैद्यकीय आवश्यकता आणि व्यापक जनहिताचा विचार करून ही मंजुरी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली आहे. यापूर्वी शनिवारी अमेरिकेतील औषध निर्माता फायझर या कंपनीच्या भारतीय युनिटने कोविड -१९ या लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी औपचारिक मंजुरीसाठी डीसीजीआयकडे अर्ज केला आहे.

कोविड -१९ ही लस ब्रिटन आणि बहरीनमध्ये मंजूर झाल्यानंतर फायझरने भारतात मंजुरीसाठी ही विनंती केली आहे. त्याचबरोबर एसआयआयने रविवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहकार्याने देशातील विविध भागातील ऑक्सफोर्डच्या कोविड -१९ लसीच्या ‘कोविशिल्ड’ची तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेतली.

क्लिनिकल चाचण्यांतील चार डेटावरून असे दिसून आले आहे की करोनाची लक्षणं असलेले रुग्ण आणि विशेष करून करोनाच्या गंभीर रुग्णांवर कोविशिल्ड ही मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरली आहे. चारपैकी दोन चाचणी डेटा ब्रिटनशी आणि भारत आणि ब्राझीलशी प्रत्येकी एक संबंधित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लस ९० टक्के परिणामकारक

करोनावरील लस ९० कोविशिल्ड ही चाचणीत ९० टक्के परिणामकारक दिसून आली. ही लस लवकरच प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. अ‍ॅस्ट्राजेनेकाबरोबर १० कोटी डोसची डील झाल्याचा दावाही एसआयआयचे सीईओ अदर पुनावाला यांनी केला आहे. कोविशिल्डच्या किमान १०० दशलक्ष डोस जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील आणि शेकडो दशलक्ष डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार करता येतील, असंही अदर पुनावाला म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here