मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशात सध्या शेतकरी आंदोलनाचा () वणवा भडकला आहे. पंजाब, हरयाणातील हजारो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. शिवसेनेसह, काँग्रेस व राष्ट्रवादीनं या आंदोलनाला व उद्या होणाऱ्या ”ला पाठिंबा देत केंद्र सरकारची कोंडी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं या तिन्ही पक्षांवर टीका केली आहे. (BJP targets , Congress and NCP)

वाचा:

महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट करत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी प्रेमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी काँग्रेस, व राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ‘मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे हे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत मिळालेली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. इतकेच नव्हे, करोना काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत राज्य सरकारनं केलेली नाही,’ असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याच आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यालाही भाजपनं उत्तर दिलं आहे. ‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. कृषिमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं एक पत्र आज समोर आलं आहे, ज्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत लिहिलं आहे,’ याकडंही उपाध्ये यांनी लक्ष वेधलं आहे.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here