मुंबई: अभिनेत्री सलमा आगाची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री हिला सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामद्वारे बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीकडून सोशल मीडियाद्वारे बलात्काराची धमकी देण्यात आली, असे झाराने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी झाराच्या तक्रारीनंतर कारवाई करून एका आरोपीला अटक केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, झाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, धमकावणारी व्यक्ती हैदराबादमधील २३ वर्षीय तरुणी असून, ती एमबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलला माहिती देण्यात आली. तेथून लोकल आयपी अॅड्रेस मिळाला. आरोपी तरुणीचे नाव नूरा असून, तिने इन्स्टाग्रामवर बोगस प्रोफाइल तयार केले होते. नूरा आणि तिचा एक साथीदार एका राजकीय पक्षासाठी काम करतात. त्या माध्यमातूनच त्यांनी झाराला धमकी दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कोण आहे झारा?

झारा खान हिने अर्जुन कपूरसोबत ‘औरंगजेब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘देसी कट्टे’ या चित्रपटातही काम केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here