मुंबई: ‘केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांतील सुधारणांना अनेक विरोधी पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्येही एपीएमसी व्यवस्था मोडीत काढण्याचं सुतोवाच केलं आहे. मात्र, आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत सरकारला विरोध केला जात आहे. यात निव्वळ राजकारण असून महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका आहे,’ असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी केला. ( defend and slams Maha Vikas Aghadi)

वाचा:

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभर सध्या वातावरण तापलं आहे. या कायद्यांना विरोध म्हणून उद्या ”ची हाक देण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीच्या भूमिकेवर तोफ डागली. ‘केंद्राचे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. आज या कायद्यांना विरोध करणाऱ्या अनेक पक्षांनी यापूर्वी कायद्यातील तरतुदींचं समर्थन केलं होतं. मात्र, आता केवळ विरोधाला विरोध म्हणून हे राजकीय पक्ष आंदोलनाला पाठिंबा देत आहे. ज्या कायद्यांच्या विरोधात हे आंदोलन चाललंय, ते कायदे महाराष्ट्रानं सर्वात आधी केले आहेत. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या जाहीरनाम्यातच बाजार समित्यांचा कायदा रद्द करण्यात येईल व शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल असं म्हटलं गेलं होतं. जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल केला जाईल व एपीएमसी कायद्यातून भाजीपाला व फळे वगळण्यात येतील, असं आश्वासनही काँग्रेसनं दिलं होतं,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.

वाचा:

खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कृषी क्षेत्रातील सुधारणांचं वेळोवेळी समर्थन केलं आहे. या सर्व सुधारणांची सुरुवातच शरद पवारांनी केली आहे. त्यांच्या आत्मचरित्रातही त्यांनी एपीएमसी व्यवस्थेबद्दल परखड मत मांडलंय. एपीएमसी स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांना त्रास देऊ नयेत म्हणून तयार झाल्या होत्या. मात्र, आता त्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. कारण, माल बाजारात पोहोचवण्यासाठी १७ टक्के अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना येतो. त्यामुळं ही व्यवस्था संपवायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. आता शरद पवारांनी सांगावे की ती भूमिका मान्य नाही. पण पवारसाहेब आता तसं म्हणतच नाहीत,’ याकडंही फडणवीसांनी लक्ष वेधलं. ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत असताना विरोध करायचा आणि स्वत: सत्तेत असताना तीच भूमिका घ्यायची हा दुटप्पीपणा आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

वाचा:

शिवसेनेनंही फळ व भाजीपाला एपीएमसीच्या नियमनातून मुक्त करण्यास पाठिंबा दिला होता. खासदार विनायक राऊत यांनी संसदेच्या स्थायी समितीतही असेच विचार मांडले होते, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

‘कृषी कायद्यांच्या विरोधात केवळ पंजाबमध्ये आंदोलन झाले. त्यातही काँग्रेसच्या लोकांनी ट्रॅक्टर चालवले. अन्यत्र कुठंही मोठं आंदोलन झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनात असेही काही लोक आहेत, जे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शेतकरी सुज्ञ आहेत. योग्य ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत लवकरच पोहोचेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here