मुंबई- पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये दिसणार आहे. याआधीही राखी सावंत बिग बॉस सीझनचा एक भाग झाली आहे. त्यावेळी तिने बरीच खळबळ उडवून दिली होती. असं असलं तरी राखी सावंतने अलीकडे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राखी म्हणाली की गेल्या काही वर्षात तिच्यासोबत अनेक गोष्टी घडल्या. ज्यामुळे तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर दररोजचा दिवस घालवण्यासाठी तिला आपले दागिने आणि मालमत्ता विकावी लागली होती.

एका मीडिया रिपोर्टचा संदर्भ देताना राखी म्हणाली की गेली तीन-चार वर्ष तिच्यासाठी फारच वाईट होती. तिचं वैयक्तिक आयुष्य पुरतं ढवळून निघालं होतं. ती पुढे म्हणाली की, अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकली नाही. राखीने सांगितलं की तिची फसवणूक झाली, अनेकांनी तिला लुटलं.

राखीने सांगितलं की तिच्यासाठी हा काळ खूपच खराब गेला. तिच्याकडे जगण्यासाठी पैसेही नव्हते, यासाठी तिला स्वतःचे दागिने आणि मालमत्ता विकावी लागली. राखीने सांगितलं की आपल्या कष्टाच्या पैशाने पूर्ण केलेली स्वप्नं विस्कळीत होताना तिला दिसत होती. राखीने सांगितलं की बिग बॉसच्या घरात ती तिचे संपूर्ण आत्मचरित्र सांगेल आणि आपली कहाणी लोकांसमोर ठेवेल.

राखी गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये तिच्या वेब सीरीजचं शूटिंग करत होती की त्यादरम्यान तिला बिग बॉसकडून आमंत्रण मिळालं, जे तिला नाकारता येत नव्हतं. राखी सावंत म्हणाली की हा शो तिच्यासाठी खूप खास आहे. ती म्हणाली की, पहिल्या सीझनमध्ये जी धम्माल तिने केली होती तिच धम्माल तिला आताही करायची आहे. वेब सीरिजबद्दल बोलताना राखी म्हणाली की तिने एका आठवड्याचं चित्रीकरण संपवलं असून ती बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

गेल्या वर्षी राखी सावंत तिच्या लग्नासाठी चर्चेत होती. सोशल मीडियावर तिने दीपक कलालशी लग्न करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक दिवस या विषयावर चर्चा सुरू होती. मात्र, त्यानंतर एका महिन्यानंतर राखीने लग्न मोडण्याचीही घोषणा केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here