मुंबई महानगरपालिकेसाठी आणि मनसे युती करणार का? हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनीही भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. आमची भूमिका व्यापक आहे. राज ठाकरेंची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्य आहे पण मराठी माणसांच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, हे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.
वाचाः
मनसेचं मराठीपण खूप व्यापक आहे. महाराष्ट्राचे जे भूमिपूत्र आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं, मराठी भाषेचा वापर जे महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी संस्कृतीचा आदर करणं, हा मनसेच्या मराठी मुद्द्याचा अर्थ आहे. जर हा मुद्दा कोणाच्या लक्षात आला नसेल तर यावर चर्चा होऊ शकते, असा टोला नितीन सरदेसाई यांनी लगावला आहे.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times