पालघरः गडचिंचले येथे दोन साधूंच्या हत्याकांडप्रकरणी ४७ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

प्रकरणी गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केली होती. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं होतं. त्यातील काही जण अल्पवयीन असल्यानं त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तर, सबळ पुराव्यांअभावी काहींची सुटका करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली असता. आज जिल्हा न्यायाधीश पी. पी जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार १५ हजारांच्या जातमुचलक्यावर ४७ आरोपींना जामीन देण्यात आला आहे.

पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडात आरोपींचा कोणताही हात नसल्याचे म्हणणे न्यायालयासमोर वकिल अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी मांडले होते. या प्रकरणात फक्त संशयित आरोप म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती,असंही वकिलांनी स्पष्ट केलं आहे.

एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता.

दरम्यान, या हत्याकांड प्रकरणी गुन्हे शाखेनं १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. ‘लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here