नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय फायजर कंपनी आणि भारतातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता स्वदेशी लस निर्माता कंपनी भारत बायोटेकने ( ) केंद्र सरकारडे करोनावरील ( (vaccine covaxin ) लसला तातडीची ( emergency use) मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे. इंटरनॅशनल लिमिटेडने केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख (DCGI) व्ही. जी. सोमानी यांच्याकडे लसच्या तातडीच्या वापरासाठी अर्ज केला आहे. बनवणारी भारत बायोटेक कंपनीची लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. दोन टप्प्यातील चाचण्यांच्या डेटाच्या आधारावर भारत बायोटेकने ही मागणी केली आहे.

भारत बायोटेक ही कंपनी हैदराबादमध्ये आहे. लस देण्याची मंजुरी मागणारी भारत बायोटेकही तिसरी कंपनी आहे. सर्वात आधी फायजर कंपनीने गेल्या आठवड्यात शनिवारी भारत सरकारकडे लस देण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटने रविवारी लस देण्यासाठी डीसीजीआयकडे मंजुरी मागितली.

भारत बायोटेकने तातडीने लस देण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे. आता हा अर्ज सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडे (SEC) गेला आहे. ही कमिटी या अर्जावर विचार करेल. यापूर्वी सीरम आणि फायजरने लसच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. या अर्जांवर येत्या दोन आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, असं सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

भारत बायोटेक ही स्वदेशी कंपनी आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटने ज्या लससाठी अर्ज केला आहे ती ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी मिळून बनवण्यात आली आहे. ऑक्सफोर्डच्या कोव्हीशिल्डसची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. १६०० व्हॉलिंटिअर्सचा या चाचणीत समावेश आहे. या लसचे उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्स्फोर्डसोबत करार केला आहे.

भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लसची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. देशातील २६,००० व्हॉलिंटिअर्स चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी झाले आहेत. त्यांना ही लस देण्यात येत आहे. देशात २४ ठिकाणी या लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे. या लसीचे दोन डोस आहेत. हे दोन डोस २८ दिवसांच्या कालावधीत दिले जातात.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकने १५० कोटी रुपये खर्च करत आहे. यानंतर आणखी जवळपास १२० ते १५० कोटी रुपये खर्च नव्या सुविधांवर होण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here