वाचा:
करोनाच्या लसीकरण मोहिमेबाबत पुणे जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी डॉ. यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. चेतन खाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, जिल्हा माता बाल संगोपनन अधिकारी डॉ. सचिन एडके आदी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्राच्या सूचनांच्या अनुषंगाने लसीकरणावर सखोल चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात किती आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार, यावरही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३१ हजार ९१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यात पुणे शहर जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर राखण्यात येणार आहे.
वाचा:
लसीच्या इमर्जन्सी वापरासाठी तीन अर्ज सादर
एकीकडे लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे इन्स्टिट्युटनेही कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पावले टाकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरमला भेट दिली तेव्हा कोविशिल्ड लस अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णाला देण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत चर्चा झाली होती. पुढील दोन आठवड्यांत तशा परवानगीसाठी आम्ही अर्ज करणार आहोत असे सीरमचे सीईओ यांनी सांगितले होते. त्यानुसार भारताच्या औषध महानियंत्रकांकडे सीरमकडून अर्ज करण्यात आला आहे. खुद्द पूनावाला यांनीच आज ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. दुसरीकडे फायझरनेही आजच करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली असून पाठोपाठ स्वदेशी कंपनी भारत बायोटेकनेही आमच्या लसला मंजुरी द्या, अशी विनंती करणारा अर्ज महानियंत्रकांकडे केला आहे. त्यामुळे एकाचवेळी तीन लसींबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यातूनच लसीकरणाच्या चर्चेलाही वेग आल्याचे दिसत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times