तोमर यांची ( ) भेट घेणाऱ्या तीन शेतकरी संघटनांनी एक पत्रक जारी केलं आहे. शेतकरी संघटनांच्या सूचनेनुसार ही विधेयकं कायम ठेवली पाहिजेत. शेतकरी संघटनांनी सूचना केल्या आहेत. आम्ही एमएसपी आणि बाजार समिती व्यवस्थेच्या बाजूने आहोत. पण सुचविलेल्या दुरुस्त्यांसह हे कायदे कायम ठेवले जावेत अशी आमची मागणी आहे, असं शेतकरी संघटनांनी पत्रात म्हटलं आहे.
शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारसोबत शनिवारी झालेल्या मागच्या बैठकीत तीन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची सरकारची विनंती फेटाळून लावली होती. तिन्ही कायदे रद्द करण्यावर आपण आम्ही ठाम असल्याचं नेत्यांनी सरकारला सांगितलं.
पंजाब आणि हरयाणातील हजारो शेतकरी गेल्या ११ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे आणि पोलिसांचे बॅरिकेड्स फोडून इथपर्यंत पोहोचले झाले आहेत. या काळात तीन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या मागण्या अटीसह सरकार समोर ठेवू, असे शेतकरी म्हणाले. दीर्घकालीन आंदोलनासाठी तयार असल्याचं शेतकरी म्हणालेत. आंदोलनाचं उद्दीष्ट साध्य होत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times