पुणे: राज्य सरकारच्या कौशल्य विकास, व उद्योजकता विभागाने राज्यातील वेगवेगळ्या २७५ कंपन्यांशी संपर्क साधून ४३ हजार ३४ जागांवर बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेले आणि नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी दहावी उत्तीर्णपासून ते अभियांत्रिकीपर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना जास्तीत जास्त सुमारे १८ हजार रुपयांची नोकरी मिळू शकणार आहे. ( Updates )

वाचा:

या रिक्त जागांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी १३ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असल्याचे या विभागाच्या सहायक आयुक्त यांनी सांगितले. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवणाऱ्यांनाच या मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

वाचा:

‘या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या २७५ कंपन्यांमध्ये रूप पॉलिमर्स, , अॅषडविक हायटेक, , वायका इन्स्ट्रुमेन्ट्स, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन, शार्प डिझायनर्स अॅसण्ड इंजिनिअर्स आदी प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे’, असे पवार यांनी सांगितले.

अशी करा ऑनलाइन नोंदणी

विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सीकर या पर्यायामध्ये जाऊन अर्जदारांना लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना आयडी व पासवर्ड मिळेल. त्याद्वारे डॅशबोर्डवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या पर्यायावर क्लिक केल्यावर संबंधितांना जिल्हा निवडता येणार आहे. ही प्रक्रिया केल्यावर सेट लेव्हल मेगा जॉब फेअर पर्यायाद्वारे रिक्तपदांची माहिती मिळणार असून, त्यानुसार अर्जदारांनी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदारांना मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ हे एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.

वाचा:

बस व्यवस्था आणि जेवणही कंपनीचं!

राज्यातील विविध कंपन्यांमध्ये रिक्त असलेल्या ४३ हजार ३४ जागांवर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. काही कंपन्यांकडून निवड झालेल्यांची त्यांच्या निवासस्थानापासून कंपनीच्या ठिकाणी बसेसद्वारा ने-आण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अनेक कंपन्यांकडून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्यांना जास्तीत जास्त १८ हजार रुपयांपर्यंत वेतन आणि एक वर्षाचा प्रोबेशन पिरीयड असणार आहे, असे याबाबत माहिती देताना अनुपमा पवार यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here