कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या कृषी विधेयकाच्या विरोधात विविध पक्ष, संघटनांनी मंगळवारी पुकारला आहे. त्या पार्श्वभुमीवार पुणे पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे, त्या पोलिस ठाण्यांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. त्याशिवाय आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलनकत्र्यांशी योग्य समन्वय साधण्यात आला आहे. आंदोलन कर्त्यांकडून निवेदने स्वीकारणे, एकाच जागेवर निर्देशने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. आंदोलन करताना कोणीही सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होईल असे वर्तन करणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हडपसर, सातवाडी, मार्केटयार्ड, धायरी फाटा, जिल्हा परिषद, मंडई, लक्ष्मी रस्ता परिसरात आंदोलन करण्यात होणार असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी पोलिसांकडून योग्य तो समन्वय ठेवण्यात आला आहे. भारत बंद संविधानीक मार्गाने व्हावा, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन शिसवे यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times