मुंबई: शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर दुटप्पीपणाचा आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते यांना शिवसेना खासदार यांनी आज प्रत्युत्तर दिलं. ‘दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि त्यावर बोला,’ असं राऊत यांनी फडणवीसांना सुनावलं. ( taunts Devendra Fadnavis)

वाचा:

”च्या () पार्श्वभूमीवर राऊत पत्रकारांशी बोलत होते. ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोका उत्स्फूर्तपणे बंद करत आहेत. कुठेही जोरजबरदस्ती केली जात नाही,’ असं ते म्हणाले. फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा हा केवळ राजकारणाचा भाग आहे. या तिन्ही पक्षांनी यापूर्वी वेळोवेळी कायद्यातील तरतुदींना पाठिंबा दिला आहे. ‘एपीएमसी’तून फळे व भाजीपाला नियमनमुक्त व्हावा याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्वत: संसदेत तशी भूमिका मांडली होती, ही आठवण फडणवीस यांनी करून दिली होती.

वाचा:

त्याबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, ‘उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांब जाईल. आज काय चाललंय ते बघायला हवं. दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे. ‘रस्त्यावर या’ असं आवाहन त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी किंवा तृणमूल काँग्रेसनं केलेलं नाही. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना कोणाचंही राजकीय पाठबळ नाही. त्यांच्या हातात कुठलाही राजकीय झेंडा नाही. त्यामुळं आपण काय भूमिका मांडतोय ह्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दहावेळा विचार करायला हवा.’

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here