‘अयोध्येत राममंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव जी गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते. पण ते कुठे व्हावे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर विषय मिटला असल्याने कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे,’ असं विधान काँग्रेसचे प्रवक्ता यांनी केले आहे.
सावंत यांनी ट्विट करत काँग्रेसची राम मंदिरासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पुढे लिहिलंय, ‘आम्ही पक्षीय राजकारण व जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुध्दीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे ही आमची भावना आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्याग प्रेम बलिदान करुणा व समतेचे प्रतिक आहेत त्यांच्या दर्शनाने कोणाहीबद्दलचा द्वेष, तिरस्कार नाहीसा होतो व प्रेम सद्भावना जागृत होते. जे तेथे जातील त्या सगळ्यांच्या मनात करुणा व समाजातील सर्व वर्गांबाबत सद्भावना जागृत होवो, ही आम्ही प्रार्थना करतो. यातच देशहित आहे.
या प्रार्थनेकरिता काँग्रेसचे अनेक जण भविष्यात राममंदिरात जातीलच!’
राज्यातील महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होताच अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी आज हे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांचे हे ट्विट आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times