रत्नागिरी: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांच्या ”ला पाठिंबा देणारी महाविकास आघाडी सध्या भाजपच्या रडारवर आहे. विशेषत: शिवसेनेला भाजपकडून लक्ष्य केलं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यानंतर आता माजी खासदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वाचा:

ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘शिवसेना हा अत्यंत गोंधळलेला पक्ष आहे. या पक्षाचा उतरता काळ सुरू झाला असून दिवसेंदिवस त्यांची पत घसरत आहे. दिल्लीतही शिवसेनेला कुणी विचारत नाही. अलीकडच्या काळात एकाही भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्याचं दिसत नाही. ते दररोज नवीन खोटं बोलतात. एक दिवस महाराष्ट्राची जनता शिवसेनेची दखल घेणं बंद करेल. कालांतरानं हा पक्षच अदखलपात्र ठरेल,’ असं नीलेश राणे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरही नीलेश राणे यांनी सडकून टीका केली. ‘शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. त्यांचा या विषयाशी संबंध नाही आणि तेवढी त्यांना जाणही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय,’ असा दावा त्यांनी केला.

‘राष्ट्रवादीचा विरोध न समजण्यासारखा’

कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी शरद पवार यांनीच काही वर्षांपूर्वी केली होती. त्यामुळं आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. केवळ नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. पण केवळ पंजाबमध्ये विरोधाची तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नाही, असा दावाही त्यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here