मुंबईः नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रात पाठिंबा मिळत नसल्याचं निदर्शनास आल्यावर पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा, आरोप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीला चोहोबाजूंनी वेढा घालून बसलेल्या देशभरातील शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात या बंदला पाठिंबा दिला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र पोलिस बळांचा वापर करुन बंद यशस्वी झाल्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सरकारवर केली आहे.

‘पोलीस बळ वापरून अनेक ठिकाणी बंद करत असल्याची उदाहरणं समोर आली आहेत. रायगडमध्ये दंडुक्याचा आधार घेत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून सरकारी यंत्रणाचा वापर करुन बंद यशस्वी झाल्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे, ‘असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

‘हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पंजाब, हरयाणातील काही मुठभर लोकं सोडली तर या देशातील नागरिक कायद्याच्या बाजूनं आहेत. शेतकऱ्यांच्या मालाची किंमत वाढणार आहे त्याचा दर्जा वाढणार आहे उत्पादन वाढणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘शेतकरी नेते शरद जोशींचं म्हणणे होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात माल विकता आला पाहिजे, असं म्हणण शेतकरी नेते शरद जोशी यांनी सातत्याने म्हटलं होतं. या कायद्यामुळं शरद जोशींचे स्वप्न पूर्ण होतेय. परंतु काही मुठभर लोक आंदोलन घडवून आणत आहेत. शेतकरी कायद्यांच्या बाजूनं आहेत. कायदा शेतकऱ्यांसाठी आहे,’ असा ठाम विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here